Breaking News

रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे “लक्ष्मीदर्शन” करतेय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून “टोल” गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली तर नाही ना? मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करुन “लक्ष्मीदर्शन” तर करीत नाही ना? फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? , अशी टीका भाजपा नेते आमदार …

Read More »

केंद्राकडे जूलैअखेर महाराष्ट्राची २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी केंद्रानेच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा; संकटातून बाहेर काढावे - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख कोटींवर जाईल अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत …

Read More »

राजा आणि मोर… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

आटपाट नगरात एक राजा राहायचा. हा राजा बरीच वर्ष जंगलात राहिला, असं त्याचं म्हणणं. पुराव्यासाठी बरेचसे फोटो त्याने प्रजेपुढे ठेवले. प्रजेने विश्वास ठेवला आणि राजाने आपला फोटो वॉट्सअप डीपी ठेवला. राजा खरंच जंगलात होता का यावर शंका उपस्थित करणाऱ्यांचे राजाने राजद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना इतर प्रजेपेक्षा नेहमी अपमानकारक वागणूक दिली. राजा राज गादीवर बसण्यापूर्वी आपण जंगलात साधू म्हणून …

Read More »

कोरोना: तीन दिवसानंतर पुन्हा बाधितांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा दुप्पट १४ हजार ८८८ नवे बाधित, ७ हजार ६३७ बरे झाले, २९५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आज पुन्हा तीन दिवसानंतर बरे होवून घरी जाणाऱ्या ७ हजार ६३७ रूग्णांपेक्षा बाधित रूग्ण १४ हजार ८८८ इतके दुपटीने आढळून आले आहेत. त्यामुळे घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या  ५ लाख २२ हजार ४२७ …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या सुधारीत वेळापत्रक नंतर जाहीर करणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेसह अनेक परिक्षा रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला. मात्र स्पर्धा परिक्षांबाबत सातत्याने तारखा नव्याने जाहीर करण्यात येत होत्या. त्यामुळे या परिक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत संभ्रमावस्था निर्माण होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे …

Read More »

सरकार देणार मच्छिमारांना १० ते ३० हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …

Read More »

वाहतूकक्षेत्राला दिलासा : माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना ७०० कोटींची कर माफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वाहनांना १०० टक्के करमाफी दिल्याने सरासरी ७०० कोटी रूपयांची करमाफी मिळणार आहे. दिनांक १ एप्रिले …

Read More »

मुंबई महानगरातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR Region) ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या प्राधिकरणाचे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (MMR-SRA) चे मुख्यालय ठाणे …

Read More »

शेखर चन्ने, तुकाराम मुंडे यांच्यासह १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अण्णासाहेब मिसाळ कोकण विभागाचे नवे विभागीय आयुक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज प्रमुख १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह शेखर चन्ने, अण्णासाहेब मिसाळ, लोकेश चंद्रा यांच्यासह अन्यांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांची बदली जलसंधारण …

Read More »

कोरोना : राज्यात आणि देशात फक्त २ टक्क्यांचा फरक : बाधित संख्या ७ लाखावर १० हजार ४२५ नवे बाधित, १२ हजार ३०० बरे झाले तर ३२९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी देशातील बरे होणाऱ्या रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत महाराष्ट्र फक्त २ टक्क्याने मागे असून देशातील बरे होण्याचा दर ७५.९२ इतका आहे. तर राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ७३. १४ इतके आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे. काल १४ हजाराहून अधिक रूग्ण …

Read More »