मुंबई : प्रतिनिधी देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली. मागील ८ ते …
Read More »‘अष्टवक्र’ दाखवणार व्यवस्था आणि अपराधी यांच्यातील दुष्टचक्र तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार
मुंबई : प्रतिनिधी आजवर समाजव्यवस्था आणि राजकारण यावर भाष्य करणारे बरेच सिनेमे बनले आहेत. सद्य परिस्थितीची सत्य घटनांशी सांगड घालून बनलेले असे सिनेमे समाजमनाला आरसा दाखवण्याचं काम करतात आणि समाजामध्ये हळूहळू बदलाची नवी प्रक्रिया सुरू होते. ‘अष्टवक्र’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटचालीतील पुढचं पाऊल ठरणारा आहे. माणसाच्या जडण घडणीत …
Read More »बॅाक्सिंगवरचा ‘बेधडक’ करणार ‘दमछाक…’ संतोष मांजरेकर यांचा दिग्दर्शनाखालील बेधडक लवकरच भेटीला
मुंबई : प्रतिनिधी अलीकडच्या काळात हिंदी सिनेसृष्टीत खेळ आणि खेळाडूंच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे, पण प्रादेषिक सिनेसृष्टीमध्ये अद्याप अशा प्रकारच्या सिनेमांची संख्या अत्यल्प आहेत असंच म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. ‘बेधडक’ हा आगामी सिनेमा लवकरच मराठी सिनेसृष्टीतील ही उणीव भरून काढणार आहे. बॅाक्सिंगवर आधारित असलेल्या …
Read More »तब्बल दोन वर्षानंतर तुरुंगातील ओबीसी नेता बाहेर छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर
मुंबई : प्रतिनिधी विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मागील दोन वर्षापासून भायखळा येथील आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे ओबीसी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जांमीन फेटाळल्यानंतर भुजबळ पुन्हा मुंबई उच्च मुंबई न्यायालयात धाव घेतली. त्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा आज अखेर …
Read More »सरकार विरोधातील मराठा क्रांती मोर्चाला फायनान्स करणारे कोण? आम्हाला माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा काढणाऱ्यांना फायनान्स करणारे कोण ? तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदांची बीले अदा करणारे कोण आहेत? याची माहिती सरकारकडे इंटेलिजन्स असल्याने सर्व माहिती मिळते असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत केवळ सरकारच्या विरोधात मराठा समाजाला उचकाविण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक नवनव्या गोष्टी …
Read More »राज्याच्या राजकारणात भाजपचे गरज सरो वैद्य मरो निस्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या चिंतामण वनगांचा वारसदार पैसेवाला ठरणार
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विद्यमान आमदार, खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची पावती अथवा त्याने केलेल्या कष्टाला पोहोच म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील कोणाही एकाला राजकिय वारसदार म्हणून त्या राजकिय पक्षाकडून जाहीर केले जाते. परंतु भाजपने त्यांच्या पक्षाचे निष्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या व …
Read More »मराठा आरक्षणाबाबत १५ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडणार मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा
मुंबई : प्रतिनिधी येत्या पंधरा दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी जर केली नाही, तर आतापर्यंत सरकारने समाजाचे मूक मोर्चे पहिले आहेत. पण समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा कृती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार संस्थांमुळेच दुधाला हमीभाव मिळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुधाला हमीभाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुकट दूध देण्याचे आंदोलन सुरु केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण ही होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर या दोन पक्षांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार संस्थांमुळेच हा वाढीव दर मिळत नसल्यानेच …
Read More »काँग्रेसला अखेर तीन जागा दिल्यानंतरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी विधान परिषदेसाठी आघाडी झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने देत लातूर आणि परभणीच्या एका जागेची अदलाबदल करत नाशिक, सिंधुदुर्ग आणि वर्धा, अमरावती जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेसाठी आघाडी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. बँलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नव्हेतर ऑफलाईन स्कॉलरशिप मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर …
Read More »
Marathi e-Batmya