मुंबई : प्रतिनिधी गोरेगांव येथील पत्राचाळ आणि एलफिस्टनमधील फितवाला चाळीच्या पुर्नविकासात बिल्डरांनी घोटाळा करून रहिवाशांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या चाळींच्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडाच्या दुरूस्ती व पुर्नवसन मंडळ आणि मुंबई मंडळाला दिले. एलफिन्स्टन रोड येथील फितवाला चाळ आणि गोरेगांव येथील पत्रावाला …
Read More »अल्पसंख्याक उमेदवारांना जात प्रमाणपत्र देताना पक्षपात उपजिल्हाधिका-यांची चौकशी करण्याची आमदार अॅड. पठाण यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पडताळणी करताना अल्पसंख्याक उमेदवारांना क्लिष्ट प्रश्न विचारून उमेदवाराला नाऊमेद करत आहेत. तसेच जात प्रमाणपत्र मिळता कामा नये, याची पुरेपूर दक्षता घेत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार अॅड वारीस पठाण यांनी करत अशा हेतू पुरस्सर वागणाऱे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांची …
Read More »गरीबांसाठी घराची अर्थसंकल्पात घोषणा, तर मुंबईतल्या गरीबांचे मंत्रालयात आंदोलन ओंकार बिल्डर्स विरोधातील आंदोलनानंतर नागरीकांना पोलिसांकडून अटक
मुंबईः प्रतिनिधी एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील गरिबांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन देवून केंद्र सरकारला २४ तासांचा अवधी होत नाही. तोच मालाड येथील नियोजित एसआरए प्रकल्पातील घरे मिळावीत यासाठी ओकांर बिल्डर्सच्या विरोधात शेकडो झोपडीवासीयांनी मंत्रालयात घुसून ठिय्या आंदोलन केले. मालाड पूर्व येथील कुरार इथल्या शांताराम तलाव येथील जानू भोईर …
Read More »सरपंच पतींनी घातला मंत्रालयात गोंधळ सरपंच पत्नीच्या मागे जाण्यापासून पोलिसांनी रोखले
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची …
Read More »अर्थसंकल्पातील घोषणांवर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत निवडणूका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर
मुंबईः प्रतिनिधी देशाचे भविष्यकालीन चित्र मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत देशातील गरीबांवर विविध घोषणांचा पाऊस पाऊस पाडला. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्यादृष्टीने मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधारी भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची …
Read More »आणि ऐन अर्थसंकल्पातच शेअर बाजार कोसळला शेअर्स नफ्यावर द्यावा लागणार कर
मुंबईः प्रतिनिधी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील शेअर बाजार चांगलाच वधारला होता. मात्र, अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आकारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. सेन्सेक्स ३५ हजार ५२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीही १० हजार ९२१ पर्य़ंत घसरला. दुपारनंतर …
Read More »केंद्राने जनतेला काय दिले… अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
काय महागणार मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढल्यामुळे मोबाईल महागणार. टी.व्ही.वरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने टी.व्ही महागणार. शिक्षण व आरोग्याच्या सेवेच्या सेसमध्ये १ टक्क्यांनी वाढ केल्याने या दोन्ही सेवा महागणार. शेती कंपन्यांना करात १०० टक्के माफी- या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी शेती क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स, गोदरेज, एअरटेल सारख्या कंपन्यांना होणार. २५० …
Read More »अर्थसंकल्पाने केली नोकरदार आणि महिलांची निराशा नोकरदारांना कोणताही कर दिलासा नाही
नवी दिल्लीः प्रतिनिधी सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाचे डोळे लागलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून काही तरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कर आकारणीच्या कोणत्याही रचनेत बदल न करता आहे, तोच ठेवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आज गुरूवारी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे नोकरदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी …
Read More »अखेर मागासवर्गीयांचे आरक्षण वाचविण्यासाठी आली राज्य सरकारला जाग पदोन्नतीतील कर्मचाऱ्यांची माहीती जमा करण्याचे अवर सचिव, कक्ष अधिकाऱ्यांना आदेश
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीत देण्यात आलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा किती मागासवर्गीयांना झाला याची माहिती न्यायालयात सादर करून पदोन्नतीतील आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने मुदतीनंतर धावाधाव सुरु केली असून सर्व विभागांच्या अवर सचिव आणि कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळविणाऱ्यांची …
Read More »‘सोन चिरैया’मध्ये सुशांत बनला डाकू अभिषेक चौबेचा नवा चित्रपट
मुंबईः प्रतिनिधी ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आजवरचा प्रवास उलगडणारा सुशांतसिंह राजपूत आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डेढ इश्किया’ आणि ‘उडता पंजाब’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. या चित्रपटाचं …
Read More »
Marathi e-Batmya