एनडीपीएस प्रकरणी कुस्तीपटू काइल कमिंग्सला जामीन मंजूर उच्च न्यायालयाने केला मंजूर जामीन

बेल्जियममधून २८१ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन (एमडी), एमडीएमए गोळ्या आणि पावडर मागवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नुकताच पुण्याचा २३ वर्षीय कुस्तीपटू काईल कमिंग्सला एनडीपीएस प्रकरणी जामीन मंजूर केला.

काइल कमिंग्ज यांना अटक करणे हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे नमूद करून न्या. मनीष पितळे यांनी अर्जदार काईल कमिंग्सला काही अटींसह जामीन मंजूर केला.

विशेष तपास पथक आणि गुप्तचर शाखेने संयुक्तरित्या एक पार्सल पोस्ट ऑफिसमध्ये रोखले होते. तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना त्या पार्सलमध्ये २३० ग्रॅंम अमलीपदार्थ असल्याचे आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पार्सल पुण्याला पाठवून सापळा रचला. श्रवण जोशी नावाची व्यक्ती पार्सल घेऊन जाण्यासाठी आला आणि त्याने कस्टम ड्युटी भरली असता त्याला अटक केली. नंतर आणि आर्यन हळदणकर आणि याचिकाकर्ता काईल कमिंग्ज यांनाही अटक करण्यात आली. तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काइळ कमिंग्सने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, काईल कमिंग्जचा गुन्ह्यात पुरेसा सहभाग असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यादरम्यान, श्रवण जोशीला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन नाकारण्याच्या निर्णयासह श्रवण जोशीला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाला काईल कमिंग्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

पुणे पोस्ट खात्यात आलेले पार्सल जोशीसाठी आले होते. तोच मुख्य आरोपी असून त्याला जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदाराची अटक बेकायदेशीर ठरते. तसेच मुख्य आरोपी श्रवण जोशी यांना जामीन मंजूर केला असल्यामुळे अर्जदारही जामीनास पात्र असल्याचा दावा कमिंग्सच्या वतीने अँड. लक्ष्मी रमण यांनी केला. परंतु, याप्रकरणाचा कमिंग्स हाच मास्टरमाईंड होता ज्याने श्रवण जोशी यांचे नाव आणि पत्याचा वापरून प्रतिबंधित अमली पदार्थ मागले होते, असा दावा करून राज्य सरकारने जामीन अर्जाला विरोध केला.

About Editor

Check Also

ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप, निवडणूक आयोग व्हॉट्सअप कमिशन बनलेय एसआयआरच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बँनर्जी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर झाल्या आणि त्यांनी पश्चिम बंगालमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *