चंकीची मुलगी अनान्याची बॅालिवुड एंट्री ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मध्ये टायगरसोबतच चमकणार

मुंबई : प्रतिनिधी

स्टार किड्स म्हणजेच कलाकारांच्या मुलांकडून केवळ सिनेसृष्टीलाच नव्हे, तर सिनेप्रेमींनाही खूप अपेक्षा असतात. त्यामुळेच एखाद्या कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी ज्या सिनेमातून चंदेरी दुनियेत दाखल होत असतात त्या सिनेमाकडून आपोआपच अपेक्षा वा        ढतात. मुलांची तुलना त्यांच्या आई-वडीलांशी होते आणि त्यातून जे स्वत:चा वेगळा ठसा उमटवतात तेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनान्या आता या परीक्षेला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाली आहे. बहुचर्चित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या सिनेमाद्वारे ती बॅालिवुडमध्ये दाखल होतेय.

करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या सिनेमाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या यशानंतर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ची निर्मिती केली जात असल्याच्या बातम्या मागील बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’चं दिग्दर्शन स्वत: करणने केलं होतं, तर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या सिनेमात अनान्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरुणाईचा आवडता अभिनेता असलेला टायगर श्रॅाफ या सिनेमात अनान्याचा नायक बनला आहे. याशिवाय तारा सुतारीया ही अभिनेत्रीही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी पालकांचा वारसा चालवत स्वत:ला सिद्ध करीत सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. करीना कपूर, श्रद्धा कपूर, आलिया भट या अभिनेत्रींनी आज बॅालिवुडच्या टॅाप टेन अभिनेत्रींमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. अनान्याप्रमाणेच श्रीदेवी-बोनी कपूर यांची कन्या जान्हवी आणि सैफ अली खान-अमृता सिंह यांची कन्या सारासुद्धा हिंदी सिनेसृष्टीत एंट्री करीत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत दाखल होतानाच अनान्याला तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. यात ती कशा प्रकारे आपलं स्थान भक्कम करते ते पाहायचं आहे.

 

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *