काळवीटने केली सलमानची शिकार शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड

मुंबई : प्रतिनिधी

जवळजवळ २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित जोधपूर काळवीट हत्या प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात आला. या खटल्याचा निकाल सुनावताना न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुरू असलेल्या या खटल्यात देवकुमार खत्री यांनी या प्रकरणाचा निकाल सुनावला. १९९८ मध्ये जोधपूर येथे ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या चित्रकरणादरम्यान अभिनेता सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती.

या प्रकरणी सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहित करण्याचा आरोप असलेल्या सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम यांची मुक्तता करण्यात आली. सलमानने काळवीटाची शिकार केली तेव्हा वरील कलाकार त्याच्यासोबत गाडीत होते. आज सकाळी सुनावणी दरम्यान करण्यात आलेले सर्व आरोप सलमानने फेटाळून लावले. तरीही सलमानला दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने या प्रकरणात सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमानला सुनावण्यात आलेली शिक्षा तीन वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्याला जामिनही मिळण्याची शक्यता नाही.

 

About Editor

Check Also

बॉलीवूडच्या टीकेनंतर संगीतकार ए आर रहमान यांचे वक्तव्य बदलले भारत देश प्रेरणादायी आणि घर असल्याचे केले वक्तव्य

संगीतकार ए आर रहमान यांनी एका मुलाखतीत केलेल्या टिप्पणींबद्दलच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी भारताप्रती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *