फिल्मीनामा

दिमाखदार सोहळ्यात “धर्मवीर – २” चित्रपटाचं म्युझिक लाँच चित्रपटाला सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज

स्वर्गीय आनंद दिघेच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या “धर्मवीर – २” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन,ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित …

Read More »

आमिर खान आणि अमिताभ बच्चनने घेतले नवे लक्झरी घर किमान किंमत ९ कोटी

गतवर्षी लक्झरी रिअल इस्टेट डीलच्या विक्रमी संख्येनंतर, २०२४ मध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये सेलिब्रेटींकडून आकर्षित होत राहिले. २०२३ मध्ये, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांसारख्या आघाडीच्या बॉलीवूड स्टार्सच्या समूहाने काही लक्झरी घरे विकत घेतली आहेत. यावर्षी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मुंबई रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय …

Read More »

कल्की 2898 एडी चित्रपटावर सुपरस्टार रजनीकांत खुषः दोन दिवसात २८९ कोटी रूपयांची कमाई दिग्ददर्शक नाग अश्विनने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याची प्रतिक्रिया

समाज माध्यमांवर एक छोटासा जीआयएफ पध्दतीचा ट्रेलर रिलीज करत कल्की 2898 एडी इतकेच नाव पुढे यायचे. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करणाऱ्या अनेक तरूणांना नेमकी ही जाहिरात कशाची आहे याचा काही केल्या उलघडा होत नव्हता. मात्र नुकताच २७ जून रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि या उत्सुकतापूर्ण चित्रपटाबाबत ट्रेलरचा उलघडा झाला. …

Read More »

अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न

मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चेने समाज माध्यमात विविध पध्दतीने चर्चा होत होत्या. तर हिंदूत्ववाद्यांकडून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या विरोधात ट्रोल मोहिम राबविली जात होती. मात्र या ट्रोल वाल्यांना जराही भीक न …

Read More »

अभिनेते प्रकाश राज खिल्ली उडवित म्हणाले, शिकलेला नेता निवडण्यात… पेपरलिक प्रकरणावरून साधला निशाणा

मागील १० वर्षात बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात सातत्याने पेपर लिकच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या पेपर लिकचा फटका बसला आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या NEET परिक्षेचा पेपरही लिक झाला. या पेपर लिकचे धागेधोरे गुजरात, बिहार आणि उत्तर …

Read More »

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार गोल्डन थ्रेडला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार हे या देशाचे खरे कोहीनूर हिरे आहेत असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपट हा समाजाचा …

Read More »

अभिनेता चिरंजीवीच्या माजी जावई सिरिश भारद्वाज यांचे निधन खासगी रूग्णालयात वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चिरंजीवी यांचे माजी जावई सिरिश भारद्वाज यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. फुफ्फुसाच्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेता श्री रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. त्याच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे कुटुंब आणि रुग्णालयाने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. …

Read More »

५८ , ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

५८ , ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे …

Read More »

सिध्दु मुसेवाला प्रमाणे सलमान खानची हत्या करण्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कट नवी मुंबई पोलिसांनी दिली माहिती

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बॉलीवूड अभिनेता सलमान खानला तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलने मारण्याचा कट आखला होता. या पिस्तूलाने २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पनवेलमधील सलमान खानवर त्याच्या फार्म हाऊसजवळ हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी …

Read More »

रवि वर्मन पार्वती बाऊलच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट “जॉय गुरु” शूट करणार काल्पनिक कथेवर आधारीत चित्रपट

बंगालच्या बाऊल परंपरेचे समानार्थी नाव असलेले पार्वती बाऊल हे केवळ गायक नाहीत तर कथाकार, चित्रकार आणि कवी आहेत ज्यांनी बाऊल संप्रदायाचे आध्यात्मिक आणि कलात्मक सार साकारले आहे. तिचे जीवन आणि कार्य बाऊल परंपरेच्या गूढ आणि तात्विक पैलूंशी खोलवर गुंफलेले आहेत, जे प्रेम, भक्ती आणि दैवी संबंध शोधण्याच्या मार्गावर जोर देते. …

Read More »