फिल्मीनामा

‘मस्का’ लावत अभिनेता बनला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी प्रियदर्शन जाधवची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘सायकल’ हा विविध पुरस्कार सोहळ्यांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत गाजलेला सिनेमा कालच प्रदर्शित झाला आहे. अशातच ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला आहे. आजवर कधी छोट्या पडद्यावरील तर कधी मोठ्या पडद्यावरील विविध …

Read More »

टकमक टोकावर बसून दिग्पालने लिहिली सिनेमाची पटकथा सिनेमासाठी जवळजवळ सहा वर्षे संशोधन

मुंबई : संजय घावरे एखादा सिनेमा लिहायचा म्हटला की त्यासाठी त्या पोषक वातावरण गरजेचं असतं असं सर्वच लेखक सांगतात. पटकथेसाठी आवश्यक असणाऱ्या कल्पना विस्तारासाठी काहीजण एकांतात जातात, तर काही गर्दीच्या शहरातही स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतात… काही ध्येयवेडे लेखक-दिग्दर्शक मात्र याला अपवाद ठरतात. या पठडीत मोडणारे लेखक पटकथेसाठी आवश्यक असणारी …

Read More »

‘अष्टवक्र’ दाखवणार व्यवस्था आणि अपराधी यांच्यातील दुष्टचक्र तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी आजवर समाजव्यवस्था आणि राजकारण यावर भाष्य करणारे बरेच सिनेमे बनले आहेत. सद्य परिस्थितीची सत्य घटनांशी सांगड घालून बनलेले असे सिनेमे समाजमनाला आरसा दाखवण्याचं काम करतात आणि समाजामध्ये हळूहळू बदलाची नवी प्रक्रिया सुरू होते. ‘अष्टवक्र’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटचालीतील पुढचं पाऊल ठरणारा आहे. माणसाच्या जडण घडणीत …

Read More »

बॅाक्सिंगवरचा ‘बेधडक’ करणार ‘दमछाक…’ संतोष मांजरेकर यांचा दिग्दर्शनाखालील बेधडक लवकरच भेटीला

मुंबई : प्रतिनिधी अलीकडच्या काळात हिंदी सिनेसृष्टीत खेळ आणि खेळाडूंच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे, पण प्रादेषिक सिनेसृष्टीमध्ये अद्याप अशा प्रकारच्या सिनेमांची संख्या अत्यल्प आहेत असंच म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. ‘बेधडक’ हा आगामी सिनेमा लवकरच मराठी सिनेसृष्टीतील ही उणीव भरून काढणार आहे. बॅाक्सिंगवर आधारित असलेल्या …

Read More »

‘वाघेऱ्या’ गावात विनोदवीरांचं त्रिकूट विनोदाचे मिशन फत्ते करण्यासाठी किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि नंदकिशोर चौगुले

मुंबई : प्रतिनिधी विनोदी सिनेमांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. त्यामुळेच विनोदी सिनेमांची लाट कधीच ओसरत नाही. रुपेरी पडद्याच्या माध्यमातून चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात यशस्वी होणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक डोक्यावर घेतात आणि पुन: पुन्हा त्यांच्या सिनेमांची वाटत पाहतात. ‘वाघेऱ्या’ या सिनेमात प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमातील विनोदी …

Read More »

मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांची जयंती उत्साहात साजरी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी आपल्या देशात चलचित्राची मुहूर्तमेढ रोवत चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती मराठी कलाकार-तंत्रज्ञांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. दादर येथील दादासाहेब फाळके चौकात जयंती साजरी करण्यासाठी जमा झालेल्या कलाकारांना पाहण्यासाठी रसिकांनीही खूप गर्दी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट …

Read More »

संगीत देवबाभळी ने पटकाविले प्रथम पारितोषिक ३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

 मुंबई : प्रतिनिधी ३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे- सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या अनन्या या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिकआणि त्रिकुट, मुंबई या संस्थेच्या वेलकम जिंदगी या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.अन्य निकाल पुढीलप्रमाणे:- दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक …

Read More »

नयना मुकेला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने गौरव

मुंबई : प्रतिनिधी तसं पाहिलं तर कोणताही लहान मोठा पुरस्कार त्या व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जा प्रदान करीत असतो. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळणं म्हणजे आनंदाला पारावारच उरत नाही. अभिनेत्री नयना मुके सध्या हा आनंद अनुभवतेय. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल पुरस्काराने …

Read More »

आता प्रेक्षकच म्हणणार ‘Once मोअर’ लवकरच रसिकांच्या भेटीला चित्रपट येणार

मुंबई : प्रतिनिधी अनोख्या शीर्षकांच्या सिनेमांसाठी मराठीसृष्टी नेहमीच चर्चेत असते. एखाद्या साध्याशा शब्दाचा शीर्षकस्थानी ठेवून एखादी कथा सादर करण्यात मराठी दिग्दर्शकांचा हातखंडा असल्याचं जगभरातील सिनेरसिकांना ठाऊक आहेत. एका आगामी सिनेमाचं शीर्षकही याला अपवाद नाही. एखादा परफॅार्मन्स किंवा गोष्ट आवडल्यास की मुखातून आपोआप ‘वन्स मोअर’ हे शब्द बाहेर पडतात, पण आता …

Read More »

रुपेरी पडद्यावर येतोय ‘तेंडल्या’ क्रिकेट चाहत्याची आपल्या आवडत्या खेळाडूवरील प्रेमापोटी बनविला चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी चाहते… मग ते कलाकारांचे असोत, वा खेळाडूंचे… चाहते हे चाहतेच असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी एखादा चाहता कधी काय करेल याचा नेम नाही. क्रिकेटमधील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरचे चाहते तर जगभर पसरले आहेत. सचिन आजही इतका लोकप्रिय आहे की, क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याची क्रेझ तसूभरही …

Read More »