पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद

नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील.
नोव्हेंबरमध्ये ६ साप्ताहिक सुट्या असतील. याशिवाय विविध झोनमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.

या तारखांना बँका बंद

१ नोव्हेंबर २०२३: कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँक सुट्टी असेल.

५ नोव्हेंबर २०२३: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी

१० नोव्हेंबर २०२३: गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

११ नोव्हेंबर २०२३: दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

१२ नोव्हेंबर २०२३: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

१३ नोव्हेंबर २०२३: गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.

१४ नोव्हेंबर २०२३: अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बली प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.

१५ नोव्हेंबर २०२३: गंगटोक, इम्फाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाऊ बीज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मीपूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीयेमुळे बँका बंद १९ नोव्हेंबर २०२३: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी

२० नोव्हेंबर २०२३: पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद

२३ नोव्हेंबर २०२३: सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद

२५ नोव्हेंबर २०२३: चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

२६ नोव्हेंबर २०२३: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२७ नोव्हेंबर २०२३: गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

३० नोव्हेंबर २०२३: कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल असलेले नागपूर प्रमुख केंद्र वारी एनर्जीच्या १० गिगावॅट एकात्मिक प्रकल्पाचे भूमिपूजन

सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *