काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, अर्थसंकल्प म्हणजे…. बिल्ली चली हज को मध्यवर्ग आणि इतर घोषणांवरून खर्गे यांची अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदींवर टीका

केंद्रातील भाजपा प्रणित नव्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. यावेळी १२ लाखाचे उत्पन्न कमाविणाऱ्या नव्या मध्यमवर्गाला दिलासा देत १२ लाख रूपये कमविणाऱ्या नोकरदारांचे उत्पन्न करमुक्त असल्याचे जाहिर केले. यावरून आणि एकदंरच अर्थसंकल्पातील विविध तरतूदींवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले की, नौसो चुहे खाके बिल्ली चल्ली हज को ही म्हण आजच्या अर्थसंकल्पाला चपलख बसते अशी खोचक टीका एक्सवरून केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या १० वर्षात, मोदी सरकारने मध्यमवर्गाकडून ५४.१८ लाख कोटी रुपयांचा आयकर वसूल केला आणि आता ते देत असलेल्या १२ लाखांपर्यंतच्या कर सवलतीनुसार, अर्थमंत्री स्वतः म्हणत आहेत की एक दरवर्षी ₹८०,००० ची बचत होईल म्हणजे दरमहा फक्त ₹६,६६६ रूपयांची बचत होईल असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, संपूर्ण देश महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येशी झुंजत आहे, परंतु मोदी सरकार खोटी स्तुती करण्यात मग्न आहे. या “घोषणा करणाऱ्या” अर्थसंकल्पात, मेक इन इंडियाला त्याच्या कमतरता लपविण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन अभियान बनवण्यात आले आहे. इतर सर्व घोषणा जवळजवळ अशाच आहेत. तसेच देशातील बेरोजगार तरुणांसाठी काहीच नाही असा आरोपही यावेळी केला.

मल्लिकार्जून खर्गे पुढे आपल्या एक्सवरील ट्विटमध्ये बोलताना म्हणाले की, मोदीजींनी काल आश्वासन दिले होते की ते या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलतील, परंतु अर्थसंकल्पात असे काहीही घडले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणताही रोडमॅप नाही; कृषी मालावरील जीएसटी दरांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आली नाही. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, गरीब आणि अल्पसंख्याक मुलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि शिष्यवृत्तीची कोणतीही योजना नाही. खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणतेही सुधारणात्मक पाऊल नाही. निर्यात आणि शुल्काबाबत काही वरवरच्या गोष्टी सांगून त्यांचे अपयश लपवण्यात आले आहे. गरिबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काहीही केलेले नाही. सतत कमी होत चाललेल्या वापराला आळा घालण्यासाठी एकही पाऊल उचलले गेले नाही. गगनाला भिडणारी महागाई असूनही, मनरेगाचे बजेट तसेच आहे. कामगारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काहीही केले गेले नाही. जीएसटीच्या बहुविध दरांमध्ये कोणत्याही सुधारणांबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी नोकऱ्या वाढवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया या सर्व योजना फक्त घोषणा ठरल्या असल्याचा आरोप करत या विविध गोष्टी अर्थसंकल्पात नसल्याचे सांगितले.

तसेच शेवटी मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या एक्सवरील ट्विटमध्ये म्हणाले की, एकंदरीत, हे #Budget2025 म्हणजे मोदी सरकारचा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

Rolls-Royce

Rolls-Royce: आता रोल्स-रॉइस भारतीय बाजारपेठेत धावेल रोल्स-रॉइसचे सीईओ एर्गिनबिल्जिक यांनी सांगितले की, कंपनीची महत्त्वाकांक्षा भारताला रोल्स-रॉइससाठी घरगुती बाजारपेठ बनवण्याची आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रोल्स-रॉइसचे सीईओ तुफान एर्गिनबिल्जिक Rolls-Royce यांची भेट घेतली आणि सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *