Breaking News

अर्थविषयक

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आला असून भारताची एकूण संपत्ती ८ हजार २३० अब्ज डॉलर असल्याची माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालातून समोर आली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थने जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार श्रीमंत देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ष २०१७ …

Read More »

विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात …

Read More »

१५ फेबुवारी पर्यत खर्चाचा प्रस्ताव दिला तरच निधी मिळणार वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने विविध योजनांवरील खर्चात कपात करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले. त्यातच आता आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा अवधी राहील्याने किमान निर्धारीत केलेल्या निधीपेकीची काही रक्कम तरी विविध विभागांना खर्चायला मिळावी यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी पूर्वी वित्त विभागांला सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना …

Read More »

पर्यावरणस्नेही शहरांसाठी सिमन्स, हिताची उद्योग समुहासोबत चर्चा राज्यात यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शहरे स्मार्ट आणि स्वच्छ करण्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणस्नेही शहरांच्या निर्मितीसाठी सिमन्स आणि हिताची या उद्योग समुहांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी अशा शहरांच्या निर्मितीसाठी सरकारसोबत काम करण्याची तयारी दर्शविल्याने त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने …

Read More »

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात  संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई …

Read More »

उद्योगांना चालना देण्यासाठी फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे दिली. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे …

Read More »

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …

Read More »

राज्य सरकारकडून विकासकामांवर फक्त ४३ टक्के निधी खर्च गेल्या दोन वर्षापेक्षा ८ टक्के कमी निधीचा खर्च

मुंबई: गिरिराज सावंत राज्य सरकारकडून राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्र यासह विविध क्षेत्रात विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला आहे. मात्र एकाबाजूला विकास कामांच्या घोषणांचा धडका लावलेला असताना प्रत्यक्षात विकास कामांवर मंजूर अर्थसंकल्पातील निधीपैकी फक्त ४३ टक्के निधी खर्च केला असून मागील दोन वर्षापेक्षा सर्वात कमी निधी खर्च केला असल्याची …

Read More »

राज्य सरकारकडून चवथ्यांदा १२५० कोटींची कर्जरोखे विक्रीला एक हजार आणि २५० कोटींचे कर्जरोखे विक्रीला काढले

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारकडून गेल्या सहा महिन्यात १२५० कोटी रूपयांचे कर्जरोखे पुन्हा एकदा विक्रीस काढले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट २०१७ महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारकडून जवळपास ५ हजार …

Read More »