अर्थविषयक

भारताची व्यापार तूट घटली ५ महिन्यांतील सर्वात कमी तूट

आर्थिक आघाडीवर दिलासा देणारी बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार भारताची व्यापार तूट कमी झाली आहे. व्यापार तूट ५ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. आयात कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताची व्यापारी व्यापार तूट सप्टेंबरमध्ये १९.३७ अब्ज डॉलरवर घसरली. ही तूट पाच महिन्यांतील सर्वात कमी आहे. ऑगस्टमध्ये व्यापार तूट …

Read More »

एचसीएल टेककडून भागधारकांना लाभांश जाहीर १० रूपयांचा प्रति लाभांश

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या …

Read More »

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी, औद्योगिक उत्पादनात वाढ ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ

ऑगस्ट महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) १०.३ टक्क्यांनी वाढले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात ०.७ टक्क्यांनी घसरले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ९.३ टक्क्यांनी …

Read More »

इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल केले जाहीर लाभांशाचीही घोषणा

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे. तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. …

Read More »

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …

Read More »

तीन खाजगी बँकांची एफडीवरील व्याजदरात कपात या तीन बँकांनी केली व्याज दरात कपात

अ‍ॅक्सिस बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी एफडीवरील व्याजदरात ऑक्टोबरमध्ये कपात केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्यानंतर अ‍ॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.१० टक्के व्याजदर देईल. नवीन व्याजदर १० ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने २ वर्षांवरून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर …

Read More »

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ १७ ऑक्टोबर रोजी उघडणार ४७-५० रूपये प्रतिशेअर असणार

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ गुंतवणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी उघडणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी किंमत ४७-५० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज ही कॅस्टर ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओतून ४७.८ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ १६ ऑक्टोबर रोजी उघडेल. आयपीओ २० ऑक्टोबर रोजी बंद होईल. राजगोर कॅस्टर …

Read More »

सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक १६०००० हजार कोटींची गुंतवणूक झाली

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात सप्टेंबर महिन्यात १६,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ईन इंडिया (AMFI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येसप्टेंबर २०२३ मध्ये १४०९१.२६ कोटी रुपयांची …

Read More »

टीसीएसने केली लाभांशाची घोषणा शेअर्स बायबॅकही करणार

आयटी कंपनी टीसीएस ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसने  ११ ऑक्टोबर रोजी सांगितले की शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दराने केला जाईल. बायबॅक अंतर्गत …

Read More »

मुलीच्या आर्थिक सुरक्षेसाठी उघडा सुकन्या खाते जाणून घ्या योजनेशी संबंधित खास गोष्टी

आज ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. या दिवशी मुलींना त्यांच्या अधिकारांची आणि सक्षमीकरणाची जाणीव करून दिली जाते. मुलींना आर्थिक सुरक्षेसाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा द्यायची असेल, …

Read More »