मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्प हा मागील वर्षात किती तूट झाली, आता किती होणार आहे, शिल्लक किती राहणार आहे, गुतंवणूक किती होणार आहे याची कोणतीही माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी न देता एखाद्या सभेत भाषण केल्याप्रमाणे त्यांनी भाषण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत फक्त दोन जिल्ह्यांसाठीचा अर्थसंकल्प …
Read More »आर्थिक मंदीच्या प्रभावाखालचा ३१ हजार तूटीचा अर्थसंकल्प सादर पेट्रोल-डिझेलवरील करवाढीसह फक्त तीन नव्या घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील आर्थिक मंदी आणि राष्ट्रीयस्तरावर अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या अपुऱ्या उपाय योजनांचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले. राज्य सरकारला यंदाच्या वर्षी ३१ हजारांच्या वित्तीय तूटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच बांधकांम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंद्रांक शुल्कात १ टक्का सूट तर उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या वीज दरात कपात करत ७.५ …
Read More »अपेक्षेप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था वाढलीच नाही ६.५ नव्हे तर ५.७ च्या गतीने अर्थव्यवस्था वाढणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी यंदाच्यावर्षी राज्याची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने वाढणार असल्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र चालू वर्षासाठीच्या जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ६.५ नव्हे तर ५.७ टक्क्याने वाढणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने तब्बल १.५ टक्क्याने अर्थव्यवस्थेचा गाडा घसरल्याचे स्पष्ट होत आहे. विधिमंडळात २०१९-२० चा …
Read More »कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका
मुंबईः विशेष प्रतिनिधी गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन …
Read More »अर्थसंकल्पात पाणी पुरवठा खाजगीकरण, मोफत वीज, रेडिरेकनर दर कपातीचे संकेत ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेलाही मोफत पायाभूत सुविधा पुरविण्याचे संकेत यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर करण्यात येणार असून या अर्थसंकल्पातून राज्यातील १० महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रे पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका …
Read More »नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जणगणनेसाठी २६ कोटींची तरतूद
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. विशेष म्हणजे या पुरवणी मागण्यात काही नव्या योजनांचा सुतोवाच करण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात …
Read More »नवा उद्योग सुरु करायचंय, या मग स्टार्टअप सप्ताहमध्ये नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा अधिक माहितीकरिता team@msins.in या ईमेलवर अथवा ०२२-३५५४३०९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. …
Read More »अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस मात्र शेअर बाजार कोसळलाच एलआयसी आणि आयडीबीआय समभाग विक्रीच्या घोषणेचा परिणाम
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी देशाच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर त्याचे अत्यंत प्रतिकूल पडसाद शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थात निर्देशांक तब्बल ९८८ अंकांनी कोसळला. तर विमा क्षेत्रातील कंपन्यांसह वाहन उद्योग, पायाभूत सुविधा व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने शेअर्सचे भाव गडगडले. …
Read More »फायद्यातील LIC आणि IDBI च्या समभाग विक्रीच्या घोषणेसह इतर महत्वाच्या अर्थसंकल्पीय घोषणा अर्थमंत्री सीतारामनकडून मागासवर्गीय, आदीवासींसाठी घोषणांचा पाऊस
नवी दिल्लीः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी फायद्यातील ओएनजीसी कंपनीतील समभाग विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापाठोपाठ रेल्वेच्या खाजगीकरणास मान्यता दिली. आता फायद्यातील आणि केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांना वित्त पुरवठा करणाऱ्या एलआयसी आणि आयडीबीआय या दोन फायद्यातील वित्तीय संस्थांच्या समभाग विक्रीच्या प्रस्तावाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला …
Read More »पाच लाखाहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांसाठी नवी करप्रणाली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सर्व्हेक्षणात भाकित केल्याप्रमाणे पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न कमाविणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तर त्याहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांना १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वरील घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya