पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा मुंबईतील शाखेतील घोटाळा उघडकीस मात्र बँकेची चुप्पी

मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने हा घोटाळा आणि अनधिकृत व्यवहारांचा शोध लावला आहे. हे व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेकडून बुधवारी असे व्यवहार झाल्याची माहिती उघडकीस आणली. या वृत्तानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ टक्क्यांनी कोसळला.
मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बँकेने म्हटले की, हे अनधिकृत व्यवहार काही ठरावीक खातेदारांना फायदा होण्यासाठी केले होते. त्याचबरोबर या व्यवहारांच्या आधारे इतर दुसऱ्या बँकांनी या ग्राहकांना परदेशात आगाऊ रकमाही हस्तांतरीत केल्या आहेत. दरम्यान, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने उघड केलेली नाहीत. मात्र या घोटाळ्याची माहिती संबधित तपास यंत्रणांना दिल्याचे बँकेने सांगितले आहे.

About Editor

Check Also

6G Service: भारत ६जी मध्ये जगाचे नेतृत्व करेल 6G Service: २०३० पर्यंत ५जी वापरकर्ते एक अब्जापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे: ज्योतिरादित्य सिंधिया

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी सांगितले की भारताने ४जी मध्ये जगाचे अनुसरण केले, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *