सोलापूरात आणखी १० कोरोनाबाधीत रूग्ण जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणू ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नव्हता. मात्र मागील काही दिवसात एक रूग्ण सापडला त्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर काहीजणांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाला. मात्र आज १० कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

यापूर्वीचा रूग्ण शहरातील न्यू पाच्छा पेठ येथील रूग्ण होता. मात्र त्याचा मृत्यू झाल्यानंतर याच परिसरातील एका महिलेची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी सदर महिलेचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर सोलापूर शहर कोरोनामुक्त झाल्याचा दिलासा शहरवासियांना मिळाला. परंतु आज १० जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती,कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने आरोग्य सेवा सक्षम दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी (सीएसइार)चा प्रभावी वापर

शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *