सोलापूर: प्रतिनिधी
मागील काही दिवसांत सोलापूरातील कोरोना रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच काल ८४ रूग्ण तर आज २४ तासात १०३ नवे रूग्ण आढळून आले. विशेषत: शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने अखेर राज्य सरकारने विद्यमान सोलापूर महापालिका आयुक्त डि.आर.तावरे यांची बदली करत त्यांच्या ठिकाणी पी.सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सिवा शंकर हे महाराष्ट्र वेअरहाऊसिंगचे व्यवस्थापकिय संचालक म्हणून काम पहात होते. आता त्यांच्या ठिकाणी पालिका आयुक्त डि.आर.तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी सकाळी ८ वाजता ७४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ९२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यानंतर आलेल्या अहवालात आणखी रूग्ण वाढल्याने संध्याकाळपर्यंत या संख्येत १०३ पर्यत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण संख्या ८५१ वर पोहोचली.
Marathi e-Batmya