आरोग्य

खाजगी क्षेत्राची भागीदारी घेऊनच वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण करण्यावर भर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट सन २०३० पर्यंत ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैद्यकीय सेवा क्षेत्राचे खाजगीकरण न करता सार्वजनिक खाजगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी …

Read More »

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

मागील काही दिवसांपासून कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. आपार्श्वभूमीवर या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होवू नये या उद्देशाने आणि संरक्षण होण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर या वाढत्या तापमानामुळे उष्माघातास सामोरे जावे लागल्यास नागरीकांना मिळावयाच्या वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य …

Read More »

राज्य सरकारचे वराती मागून घोडे, हाफकीनमधील कोवॅक्सिन लस उत्पादनाला वेग देणार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लस उत्पादनाबाबतचा विचार

साधारणतः वर्षभरापूर्वी मुंबईतील हाफकिन इस्टीट्युटमधून कोविडवरील लसीची निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली. त्यानंतर कोविड लस निर्माण कऱणाऱ्या कोवॅक्सीन कंपनीसोबत राज्य सरकारने सामंज्यस करारही करण्यात आला. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही की केंद्र सरकारकडून निधी दिला गेला ना कोव्हॅक्सीनकडूनही कोणती हालचाल झाली. त्यानंतर सगळंच शांत झालं. …

Read More »

खबरदार, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकाल तर कडक कारवाई होणार - राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घोषणा

औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी Nitrosun (Nitrazepam Tablet) …

Read More »

शासकीय सेवेतील भरती टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल मार्फत होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांचे उत्तर

राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन वेळा लाट येवून गेली आहे. मात्र हा विषाणू काही केल्या जायला तयार नाही. मात्र या विषाणूपासून बचाव करून घेण्यासाठी विविध लसी बाजारात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रभावी म्हणून …

Read More »

आरोग्य मंत्र्यांची ग्वाही, नव्या रूग्णवाहिका देणार, तर हजार गाड्यांचे फ्लिट बदलणार वाहन चालकांचे वेतन लवकरच देणार – टोपे

राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत पगार लवकरच मिळणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे पद सोडल्यास इतर कर्मचारी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात. रुग्णवाहिकेचे चालक म्हणून कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद केली असून …

Read More »

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी १८ तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई शहरामध्ये बोगस पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची …

Read More »

राज्यातील कोरोना लाटेसंदर्भात आणि मास्कमुक्तीबाबत आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… घाईगडबडीत निर्णय घेणे अडचणीचे

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्येत चांगलीच घट आली आहे. तसेच मृतकांच्या संख्याही नियंत्रित राहीलेली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. पण तिसरी लाट संपली हे माझं वैयक्तिक असल्याचा खुलासा करायला विसरले …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे म्हणाले, …तर चौथ्या लाटेचा धोका नाही मार्च एप्रिलमध्ये निर्बंधमुक्त होण्याची शक्यता

जवळपास महिनाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मार्च नाही तर एप्रिल महिन्यात राज्यात निर्बंधमुक्त होण्याची शक्यता असून राज्यातील कोरोनाच्या चवथ्या लाटेचा सामना करायचा असेल तर सर्वांचेच लसीकरण व्हायला हवे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. …

Read More »