आरोग्य

प्रकाश आबिटकर यांचा मोठा निर्णय, नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण आदिवासी भागातील रिक्तपदे भरण्याचा क्रांतिकारी निर्णय

राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना, व सेवांतर्गत पदव्युतर पदवी उत्तीर्ण झालेल्या (पीजी) उमेदवाराना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील. गेल्या वर्षभरात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष द्या 'एनसीआय'मध्ये 'ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स' परिषदेचे उद्घाटन

गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष …

Read More »

Polio Drop: पाकिस्तानमध्ये मुलांना पोलिओचे ड्रॉप देण्यासाठी गेलेल्या पथकावर पालकांनी केला हल्ला

पाकिस्तान सरकारची पोलिओ निर्मूलन मोहीम अनेक कारणांमुळे आपल्या उद्दिष्टात अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. पथकातील सदस्यांवर दररोज हल्ले होतात आणि अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. दरम्यान, लाहोरमधील वृत्तानुसार, वेगवेगळ्या भागात दोन पोलिओ पथकांवर मुलांच्या पालकांनी हल्ला केला. स्थानिक माध्यमांनी मंगळवारी हे वृत्त दिले. डॉन या प्रसिद्ध वृत्तपत्राने पोलिसांचा हवाला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन 'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. ‘पल्स’ वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून ‘वेलनेस’ उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील ‘महाराष्ट्र …

Read More »

मेघना बोर्डीकर यांची माहिती, देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल

महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोन असंतुलन, हाडांचे …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बदल्या-पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकनानुसार कार्यवाही करा आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही …

Read More »

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नका खासगी किंवा शासकीय रूग्णालयांना आदेश

राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रधानमंत्री जनआरोग्य …

Read More »

मंत्री प्रकाश आबिटकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण

आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली २० वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची …

Read More »