Breaking News

मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी भाजपाचे किरण शेलार यांचा पराभव झाला

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणूकांची मतमोजणी आज सोमवार, १ जुलै रोजी झाली. वृत्त लिहिपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे उबाठाचे उमेदवार अनिल परब यांनी भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा २६,०१२ मतांनी पराभव केला. कोकण पदवीधर जागेवरील मतमोजणीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. या चारही जागांसाठी २६ जून रोजी मतदान झाले होते.

मुंबई पदवीधर निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४ मतदान झाले. त्यापैकी ६४ हजार २२२ मते वैध ठरली. ३ हजार ४२२ मते अवैध ठरली. निवडणूक जिंकण्यासाठी ३२ हजार ११२ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. अनिल परब यांच्या विजयाने आपला बालेकिल्ला वाचवण्यात ठाकरे गटाला यश आले. यापूर्वी या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विलास पोतनीस निवडून आले होते.

वृत्त लिहेपर्यंत कोकण पदवीधर जागेवर भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे आघाडीवर होते. या जागेवर त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्याशी होती. अनिल परब हे प्रदीर्घ काळापासून विधान परिषदेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे परिवहन मंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. ते २०१२, २०१८ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. आता पुन्हा ते विधान परिषदेत ठाकरे गटाचा आवाज राहतील.

निवडणूक जिंकल्यांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अनिल परब म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि असंख्य शिवसैनिकांनी माझ्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतली. हा विजय माझ्या तमाम शिवसैनिकांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो. महाविकास आघाडी या सर्व निष्ठावंत व घटक पक्ष व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. मुंबई कोणाच्या बापाची नाही, आमच्या साहेबांची आहे, असा नारा आम्ही देत ​​राहतो, असेही स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *