शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे क्रिडा विभागाकडून आवाहन

राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रिडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर १४ ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व २६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.
क्रिडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रिडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रिडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ठ क्रिडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रिडा पुरस्कार (महिला क्रिडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रिडा मार्गदर्शक, खेळाडु, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा १५ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई उपनगरचे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *