राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदी आज नियुक्ती करण्यात आली. महारेराचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागेवर आता मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज सौनिक हे जेष्ठ सनदी अधिकारी असून मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मुख्य सचिव पदावर महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. तर मनोज सौनिक यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार म्हणून करण्यात आली. तत्पूर्वी माजी सनदी अधिकारी अजोय मेहता यांचीही अशाच पध्दतीने नियुक्ती राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर करण्यात आली होती.
आता महारेराच्या अध्यक्ष पदावरील अजोय मेहता यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले मनौज सौनिक यांना महारेराच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे मागील अनेक वर्षापासून राज्यात पडलेल्या प्रथांप्रमाणे राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेल्या सनदी अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांचे सल्लागार किंवा माहिती आयोगाचे किंवा इतर आयोगाचे प्रमुख पद देण्यात येत. त्यानंतर पुन्हा एखाद्या प्राधिकरणाचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाते. त्यामुळे राज्यातील अनेक प्राधिकरण किंवा आयोग अथवा महामंडळांचे प्रमुख पद सनदी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठीच निर्माण केले गेले आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मनोज सौनिक यांच्या नियुक्तीची जारी करण्यात आलेली हीच ती ऑर्डर

Marathi e-Batmya