Breaking News

डोंबिवलीच्या बसला पनवेल जवळ अपघातः मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली भेट मध्यरात्री बस आणि ट्रॅक्टरचा झाला होता अपघात अनेकांचे प्राण वाचले

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील पनवेल नजीक दरम्यान डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या एका बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक लागून अपघात झाला. मात्र या अपघातात बस रस्त्यावरून काहीशी खोलगट असलेल्या भागात पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंबीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली ४५ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात पोलिसांनी तातडीने दाखल केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.

काल रात्री अर्थात १६ जुलैच्या मध्यरात्री १२.४५ वाजता डोंबिवलीच्या बसला अपघात झाल्यानंतर एका जागरूक नागरिकाने पोलिस कंट्रोल रूमला फोन करून अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच नवी मुंबई परिमंडळ-२ चे उपायुक्त आणि वाहतूक पोलिसचे उपायुक्तांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाला सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने रूग्णवाहिकतून एमजीएम रूग्णालयात हलविण्याचे काम सुरु केले. विशेष म्हणजे एरव्ही रूग्णवाहिका उपलब्ध होण्यास कालावधी लागतो. मात्र पोलिसांच्या व्यवस्थापनामुळे काही मिनिटातच २४ रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. या सर्व रूग्णवाहिकांमधून सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी एक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय ४६ जण गंभीर जखमी झाले असून ४ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यावेळी रूग्णालयात ३५ डॉक्टर व ४० आरोग्यसेवक सेवेवर हजर होते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार सुरु होऊन अनेकांचे प्राण बचाविण्यात यश आले.

विशेष म्हणजे पोलिसांकडून मदत कार्याला सुरुवात केली तेव्हा मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करत जून्या मुंबई-पुणे रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे बसमधील अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

दरम्यान, अपघाताचे वृत कळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी रूग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *