मोदींचे कार्टून, मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे प्रचार फिल्मला परवानगी नाकारली ! निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा अन्यथा प्रचार थांबवणार: आव्हाड यांचा इशारा

ठाणे : प्रतिनिधी

नरेंद्र मोदीसारखे कार्टून दिसते, निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे छायाचित्र असल्याने मिडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रश्नी २४ तासात हस्तक्षेप करावा अशी मागणी करत न्याय द्यावा अन्यथा निवडणूकीचा प्रचार थांबवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचाराची फिल्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कार्टून दिसते. तसेच हजारो कोटींचा बॅक घोटाळा करुन देशातून फरार झालेले आरोपी निरव मोदी, विजय मल्ल्या यांची छायाचित्रे या फिल्ममध्ये आहेत, या कारणामुळे ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व निवडणूक विभागाच्या मिडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी या प्रचार फिल्मला परवानगी नाकारली. आनंद परांजपे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी थांबविण्यासाठी, कार्यकर्त्यांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी, नंदलाल प्रकरणाच्या पोस्टर्स चार दिवसांनी उशिरा परवानगी देणे, प्रचाराच्या उर्वरित तीन फिल्मला परवानगीसाठी ताटकळत ठेवणे, प्रचार साहित्याला जाणीवपुर्वक उशिरा परवानगी देणे, हे सारे प्रकार सुरळीत सुरु असलेल्या निवडणुकीच्या कामात खोडा घालणे आणि एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी दुसाने हा प्रकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अस्तित्वात नसलेल्या बिल्डींगमधे मतदारांची नावे, निवडणूक याद्यांमध्ये घोळ याकडे लक्ष न देता मतदान कसे कमी होईल, मेहनत करणाऱ्यांना निराश करुन निवडणूक प्रचारातून थांबविण्याचा प्रयत्न काही निवडणूक अधिकारी करत आहेत. सुशिक्षित मतदारांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. प्रत्येक दिवशी होणार्‍या आचारसंहिता भंगाकडे लक्ष न देता  निवडणूक अधिकारी एका विशिष्ट पक्षाची सुपारी घेऊन काम करीत आहेत. आक्षेप घेऊनही बिनदिक्कतपणे सुरु असलेला नको चॅनल याचे उत्तम उदाहरण आहे. माजी निवडणूक आयोगाचे अधिकारी कुरेशी हे ही निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करीत आहेत. यामुळे निवडणूक आयोग विकलांग झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *