१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज १२ वर्ष उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाली नाही. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. …
Read More »महाराष्ट्रात ‘या’ सात ठिकाणी नव्या एफएम केंद्राचे उद्घाटन देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. “डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात …
Read More »१ मे ला विद्यार्थी संघटना उच्च शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यासमोर करणार अर्धनग्न भीकमागो आंदोलन ३८ दिवस झाले विद्यार्थी संघटना करतेय आंदोलन पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना यांना वेळेच मिळेना
मुंबईतील शासकिय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी कालबाह्य नियुक्तीसह विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून नियमबाह्य वर्तन आणि १२ विभागीय सहसंचालकांकडील कारभार काढून घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनाने दिलेले असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप काढून न घेतल्याने कॉप्स या विद्यार्थी संघटनेकडून मागील ३८ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच संघटनेकडून रितसर मागण्याचे …
Read More »महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात याचिका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि सीबीआय चौकशीची उच्च न्यायालयात मागणी
१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणावरून …
Read More »राज्य सरकारच्या ‘या’ विभागात निवड झालेल्या २ हजार उमेदवारांना मिळणार नियुक्ती पत्रे महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार
राज्य सरकार च्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे …
Read More »बीकेसीतील ‘वज्रमुठ’ सभेसाठी काँग्रेसच्या या ६ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र दिनी जंगी सभेसाठी सोपविली जबाबदारी
महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ …
Read More »महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा खुलासा, कोणताही अन्य डेटा लिक नाही सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास …
Read More »कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना तातडीने निलंबित करा काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
राज्यातील कल्याण निधी भरणाऱ्या ४ कोटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना गुणांना वाव देण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता विविधांगी कल्याणकारी उपक्रम, योजना राबवण्याकरिता कामगार कल्याण मंडळाची निर्मिती झाली आहे. परंतु मंत्रालयातील कामगार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार …
Read More »त्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल बाहेर, ते मृत्यू…. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?
हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिलेला असतानाही राज्य सरकारकडून ऐन उन्हाच्या तडाख्यात निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिलला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागरी सेवा दिन साजराः या अधिकाऱ्यांचा सन्मान प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर
“सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन नेहमीच खंबीर असेल’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील १३ …
Read More »
Marathi e-Batmya