साधारणतः १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशाने झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या २५ वर्षात या योजनेला फारशी गतीच मिळाली नाही. तसेच मुंबईतील झोपडपट्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच राहील्या. त्यातच मागील २० ते २५ वर्षात ज्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाला मंजूरी …
Read More »मुबई विद्यापीठाचा अजब कारभार, सरकारला न विचारताच दिली पाच एकर जमिन शासन परवानगी, कायदेशीर सल्ला आणि निविदेला बगल देत मुंबई विद्यापीठात बेकायदेशीर चित्रीकरण
एका खाजगी कंपनीला राज्य सरकारची परवानगी न घेता आणि कायदेशीर तज्ञाचा सल्ला न घेता मुंबई विद्यापीठाने आपली पाच एकर जागा एका खाजगी संस्थेला ८ महिन्याकरिता १५ लाख रुपये भाड्यावर दिल्याची घटना माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही जागा भाड्याने देण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची निविदाही मागविण्यात आली नसल्याची माहितीही पुढे …
Read More »“दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण तर अजित पवारांकडून आदित्यचे कौतुक मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा
गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते. …
Read More »आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद
भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक …
Read More »न्यायाधीशांच्या उपस्थितीतच मंत्री आव्हाड म्हणाले, हे डॉ.आंबेडकरांना अपेक्षित नव्हते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा आणि ठाणे जिल्हा न्यायालय बार संघटना यांच्या वतीने एकता आणि शक्ती कार्यक्रम
देशातील लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सध्या घबराटीचे चित्र निर्माण झाले आहे. या व्यवस्था थरथरताना दिसत आहेत. राज्यकर्ते कितीही मोठे असले तरी अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थाच देशाला तारू शकते. यासाठी न्याय व्यवस्थेला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे ठाम प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करत देशात जे काही सध्या सुरु आहे ते डॉ.बाबासाहेब …
Read More »१७ तारखेपर्यत सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात दिड वर्षाखाली नोंदविलेल्या गुन्ह्याखाली चौकशीसाठी ताब्यात घेतले
काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्लाबोल करत आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्ये १०९ जणांसह अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक केली. सध्या सदावर्ते यांना गिरगांव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असतानाच सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना तेथील एका गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतले …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश, महत्वाकांक्षी योजना आणि प्रकल्पांच्या कामाला वेग द्या संकल्पकक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावा
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: ही दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी …
Read More »मंत्री देसाईंचे आदेश, एफएम रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
आकाशवाणी, दूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावे, मुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …
Read More »अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती
संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल …
Read More »Save Vikrant प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांचा अटक पूर्व जामिन फेटाळला आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार
आयएनएस विक्रांत युध्द नौकेच्या नावावर कोट्यावधी रूपयांची माया गोळा करून ती राज्यपालांकडे जमा न करता ती भलत्याच ठिकाणी वापरल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यानंतर ट्रॉम्बे येथील पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. परंतु त्यांनी पोलिस स्टेशनला हजर न होता …
Read More »
Marathi e-Batmya