मुंबई

प्रताप सरनाईक यांची माहिती, ‘ सुजाता मडके ‘ या शहापूरच्या कन्येची “इस्रो”मध्ये थरारक झेप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले अभिनंदन

“यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले …

Read More »

प्रसिद्ध लिओनेल मेस्सीसोबत मुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” अंतर्गत खेळण्याची संधी

महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार व लोकप्रियता वाढविणे हा आहे. ही योजना १३ वर्षांखालील मुलं व मुली …

Read More »

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक सेरेना म्हसकरचे क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी केले अभिनंदन

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे. १९ ते २३ …

Read More »

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला …

Read More »

छट पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब सुविधा उपलब्ध करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले निर्देश

मुंबई परिसरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान छट पूजा उत्सव होणार असून निश्चित केलेल्या पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असून त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित …

Read More »

बदलापूरात दिवाळी निमित्त लक्ष्मी पूजनात वरूणराजाने पाणी फेरले लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर परिणाम

दिवाळी सणाचा आज तिसरा दिवस प्रथेप्रमाणे आज दिवाळीचे लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यामुळे सकाळपासूनच नागरिक आणि व्यावसायिकांकडून लक्ष्मी पूजनाची तयारी सुरु केली. परंतु आकाशातील वरूण राजाने बदालापूरात अचानक हजेरी लावत नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. पावसाच्या या अचानक आगमनामुळे नागरिकांनी त्यांच्या घरासमोर अंगणात काढलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ली व कंदील भिजले व फटाके …

Read More »

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी …

Read More »

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा जिल्हा क्रिडा अधिकार्यालयाचे आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ चे आयोजन २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील इच्छुक युवकांनी …

Read More »

महाराष्ट्र सरकारचे “मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” जाहीर ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार! -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती …

Read More »

छट पूजेदरम्यान मुंबई महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध; मेट्रो आणि बेस्ट सेवा उशिरापर्यंत सुरु राहणार मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी छट पूजेच्या तयारीचा आढावा …

Read More »