प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी सेवेसाठी भाडेदर निश्चित एक महिन्यासाठी प्रोबेशन परवाना दिला

राज्य सरकारने  महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर सोमवारी जाहीर केले. त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी  पहिला टप्पा दीड  किमीचा असून  किमान  भाडे १५ रुपये  असेल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला १० रुपये २७ पैसे प्रमाणे दर लागू होईल. हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्य परिवहन प्राधिकरणाने  मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि  मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या तीन कंपन्यांना  तात्पुरते  मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्रोव्हिजनल  लायसन्स  मंजूर केले आहे. या परवान्याची मुदत ३० दिवसांची असून त्यानंतर  कंपन्यांना अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी आणि शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *