‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याचे सत्ताधारी राहिलेल्या भाजपावर आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे असा टोला लगावला.

पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असेही ते ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे असेही ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *