१२ वीची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यानंतर १२ वी परिक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरला जाहिर होणार की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होणार याबाबत उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र पुणे मंडळाकडून १२ वी परिक्षेच्या निकालाची तारिख आजच जाहिर केली असून परिक्षेचा निकाल सोमवारी ५ मार्च रोजी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ वाजल्यापासून हा १२ वीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
http://hscresult.mkcl.org
http://mahassboard.in
http://results.targetpublications.org
https://results.navneet.com
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी परिक्षेच्या निकालाची अधिसूचना जारी केली असून या अधिसूचनेनुसार सोमवारी ५ मे रोजी निकाल दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येणार आहे. तसेच बोर्डाचा निकाल पत्रकार परिषद घेऊन जाहिर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in जाऊन निकाल पाहू शकणार आहेत.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परिक्षेत मिळविलेल्या गुणाची पडताळणी करायची असल्यास उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे किंवा स्वतः महाविद्यालयामार्फत यासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी ६ ते २० मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केल्यास लगेच समजणार
अधिकृत संकेतस्थळावर http://mahresult.nic.in जावे, त्यानंतर विद्यार्थ्यांनी HSC Examination result 2025 या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर परिक्षेचा नंबर टाकावा आणि आईचे नाव लिहावे. त्यानंतर सब्मिट वेब पेजवरच असलेल्या Submit यावर क्लिक करावे. त्यानंतर संबधित विद्यार्थ्याचा निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल तसेच त्याची पीडीएफ डाऊनलोडही विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
तसेच एसएमएसद्वारेही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. एमएचएसएससी असे टाईप करून ५७७६ या क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास निकाल समजणार आहे.
पुणे बोर्डाकडून माहितीसाठी जाहिर प्रसिध्दी पत्रक खालील प्रमाणे

Marathi e-Batmya