राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा प्रकाशनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, मुंबईकरांनी सहकार्य करावे जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सलोखा राखणार

आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबईकरांसाठी सर्वसमावेशक जाहिरनामा प्रसिद्ध केला.

सुनिल तटकरे म्हणाले की, २६५ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूका झाल्यानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका होत असून या निवडणुकीत महायुती म्हणून कोल्हापूर, जळगावमध्ये एकत्रित आहोत, तर मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ९४ जागांवर स्वतंत्रपणे लढत आहे. असे सांगतानाच आम्ही सर्वधर्मसमभाव विचाराचे पुरस्कर्ते असताना जाणीवपूर्वक २३ अल्पसंख्याक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आला मात्र ९४ उमेदवारांमध्ये ५६ उमेदवार हे मराठी भाषिक, २१ उत्तर भारतीय, २४ मुस्लिम, ६ मध्ये ३ ख्रिश्चन, तेलगू, तमिळ, बोरा समाजाचे आहेत. याशिवाय यामध्ये ५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. शिवाय ओबीसी १७, अनुसुचित जाती – १२ असल्याची माहितीही दिली.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, मुंबई शहर हे जागतिक दर्जाचे असून देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात बहुभाषिक, बहुजातीय नागरीक राहतात, या सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला सामोरे जात असल्याचेही स्पष्ट केले.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी मंत्री नवाब मलिक, आता आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी या आमच्या लोकप्रतिनिधींनी काम केले आहे. मुंबई पूर्व – पश्चिम उपनगरातील वेगवेगळ्या प्रश्नांची जाण राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनाही आहे. छगन भुजबळ हे दोन वेळा मुंबईचे महापौर राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. शहराची खडानखडा माहिती असलेले जाणते नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारवड म्हणून भुजबळ काम करत असल्याचेही यावेळी सांगितले.

सुनिल तटकरे म्हणाले की, ‘आपली मुंबई’ ‘सर्वांसाठी मुंबई’ अशी पक्षाची स्पष्ट दृष्टी ठेवतानाच यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्वांना समान संधी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आजच्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यात मांडली असल्याचे सांगितले.
मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी योजना आणि जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात

पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देताना मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना *पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार,* स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही, वायफाय आणि डिजिटल सेवा विस्तार, मुंबईच्या आर्थिक केंद्र म्हणून बीकेसी, वरळी आणि पूर्व उपनगरांचा विकास, नव्या रोजगार केंद्रांची निर्मिती, एआय चलित नियंत्रण केंद्रासह स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणांची उभारणी, अंतर्गत रस्त्यांचे जाळे खुले करुन ट्रॅफिक नियंत्रण,

पाणीपुरवठा

जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा,* २४×७ स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित, पाणी गळती रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, जलसंवर्धन, पुनर्वापर आणि वितरण प्रणाली प्रभावी व्हावी यासाठी *’जलसमृध्द नगर अभियान’,* २०३० पर्यंत ‘स्मार्ट वॉटर मिटर’ द्वारे जलसाक्षर वॉर्ड मिशन

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘झीरो वेस्ट’ धोरण,* रिसायकलिंग प्लांट वाढवणे आणि प्लास्टिक बंदी कडक करणे, मुंबईतील नाले आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी ‘नदी पुनरुज्जीवन’ अभियान, अतिवृष्टी पूर नियंत्रणासाठी नवे ड्रेनेज सिस्टम, घनकचरा टॅक्स ची प्रभावी आखणी, नागरीकांसाठी शाश्वत घनकचरा विलगीकरण व पृथक्करणासाठी बक्षिस देणार्‍या कचरा क्रेडीट प्रमाणपत्र प्रणाली राबवणार, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ,

आरोग्य

प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी आणि कोविडसारख्या साथींसाठी तयारी, *प्रत्येक रुग्णालयातील दैनंदिन माहितीसाठी अत्याधुनिक ‘डॅशबोर्ड’ ची प्रणाली उभारणार,* निदान आणि टेली कन्सल्टींग सुविधांसह मनपा रुग्णालयाचे २४×७ आरोग्य कल्याण केंद्रामध्ये (UHWC) रुपांतर, प्रत्येक मनपा शाळेत विद्यार्थ्यांना ‘हेल्थकार्ड’ पुरवणार, ‘आरोग्य संपन्न नगर’ अंतर्गत मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्रांचे एकत्रीकरण, भटक्या श्वानांचा प्रभावी बंदोबस्त आणि पाळीव श्वानांच्या परवान्यांची प्रभावी अमंलबजावणी,

शिक्षण

मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशन, सुसज्ज ग्रंथालये आणि वॉर्ड तिथे मोफत अभ्यासिकांसह करिअर मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, माध्यमिक स्तरावर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उद्योगांशी भागीदारी,

पर्यावरण आणि शाश्वतता

मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, हवा गुणवत्ता मॉनिटरींग सिस्टम, जलवायू बदलाशी लढण्यासाठी ‘क्लायमेट रेझिलिएट मुंबई’ योजना आणणार, धुळमुक्त मुंबईसाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर,

वाहतूक आणि परिवहन

दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार,* दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार, फेरीवाला धोरणाची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक वार्डमध्ये नागरीकांची समिती स्थापन करुन महापालिका व अतिक्रमणमुक्त विभागाशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे प्रयत्न,

गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन

एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,

महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण

महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी
युवा आणि रोजगार

मनपा स्तरावर जॉब फेअर आणि अप्रेंटिसशिप कार्यक्रम, मुंबईत ऑलिम्‍पिक दर्जाचे स्टेडियम आणि युवा क्लब

शासन आणि पारदर्शकता

नागरिकांच्या तक्रारींसाठी २४×७ हेल्पलाईन आणि त्वरित निराकरण, ई-गव्हर्नसन्सद्वारे सर्व सेवा ऑनलाइन, भ्रष्टाचारमुक्त मनपा प्रशासन यासह अनेक प्रमुख मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने हात घातला आहे.

यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनीही मुंबईकरांसाठी जाहिर करण्यात आलेल्या जाहिरनाम्यावर मिडियाला सविस्तर माहिती दिली.

एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे झालेल्या जाहिरनामा प्रसिद्ध कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे,मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी उपस्थित होते.

महाराष्ट्रवादी काँग्रेसचा जाहिरनामा खालीलप्रमाणेः-

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *