मुंबईः प्रतिनिधी
राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा गड राखता आला नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत तेथे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने खरी लढत या दोघांमध्येच झाली. या लढतीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार झीशान सिध्दीकी यांना झाला.
विश्वनाथ महाडेश्वर यांना ३२ हजार६९ मते, तृप्ती सावंत यांना २३ हजार ८५६ मते तर काँग्रेसच्या सिध्दीकी यांनी ३७ हजार ६३६ मते मिळवित विजय मिळविला.
Marathi e-Batmya