वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा-शिंदे सरकारची अदानीला दसरा दिवाळीची भेट बोरिवलीतील भूखंडही अदानीच्या घशात

भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारची निरोपाची वेळ आली तरी त्यांची मुंबई लुटण्याची भूक काही संपत नाहीत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई विकण्याचा सपाटा सुरुच आहे. मुंबईचा पर्यावरणीय समतोल रहावा यासाठी काँग्रेस सरकारने मुंबईत ना विकास क्षेत्र (NDZ ) निश्चित केली होती त्यातील मढ आयलंडची जमिनही भाजपा सरकारने अदानीला देण्याचा घाट घातला आहे. मढ आयलंड व्यतिरीक्त बोरिवलीतील भूखंडही देऊन भाजपा सरकारने अदानीला दसरा दिवाळीची भेट दिली असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईला लुटण्याचा सपाटा सुरुच असून आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईला जेवढे लुटता येईल तेवढे लुटून मोदानीच्या पदारात टाकण्याचे काम सुरु आहे. मोदानी विकास प्रकल्पाला आणखी एक जमीन भेट देऊन शिंदे सरकारने मोदी-शाह या मालकांच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. आम्ही धारावी हा पुनर्वसन प्रकल्प आहे हे मानतच नाही,हा केवळ अदानीचा विकास आणि धारावीचा विनाश आहे. धारावी प्रकल्पासाठी आणखी किती जमीन हवी आहे? ५५० एकर धारावीसाठी अख्खी मुंबई अदानीला देऊन टाकणार का? असे सवाल वर्षा गायकवाड यांनी केले आहेत. भाजपा शिंदे सरकारने अडीच वर्षात मुंबईचा स्वाभिमान गुजरातला गहाण ठेवला आहे. मुंबईच्या जमिनी अदानीच्या घशात घालून मुंबईकरांवर अन्याय करण्याचे पाप भाजपा शिंदे सरकार करत असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, धारावीत कोणीही अपात्र रहिवासी नाहीत, धारावीचे सर्व रहिवासी पात्र आहेत आणि सर्वांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत अशी धारावीकरांची मागणी असताना सरकार मात्र पात्र अपात्रतेचा घोळ घालत आहेत. अपात्र झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मालाड-अक्सा-मालवणी भागातील १४० एकर जमीन घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन अदानी कंपनी आणि राज्य सरकारच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकारणास दिली आहे. सुमारे साडे तीन लाख अपात्र धारावीकरांना या जमिनीवर भाडेतत्वावरील घरे देण्याचा सरकारने घाट घातला आहे. अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा हा सगळा घोळ म्हणजे या सरकारच्या खास मित्राला फायदा मिळवून देण्यासाठी जमीन बळकावण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी केला.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, धारावीकरांचा तीव्र विरोध असतानाही भाजपा शिंदे सरकार अदानीसाठी काम करून मुंबईकरांवर अन्याय करत आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला असून हा लढा सुरुच राहणार आहे. धारावीकर व मुंबईकर हा अन्याय सहन करणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपा शिंदे शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवावे, असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *