वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांचे स्वसंरक्षण की हत्या? संपर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय? असा सवाल मुंबई काँग्रेस वर्षा गायकवाड यांनी अक्षय शिंदे याच्या पोलिस एनकांऊटरवरून उपस्थित केला.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *