सध्या देशात लोकसभा निवडणूका पार पडत आहे. या लोकसभा निवडणूकीसाठी आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. तर लोकसभेचा पाचवा टप्प्यासाठी २० मे रोजी मतदानाचा पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर लगेच २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्प्यासाठीच्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी सुरुवात होणार आहे. या सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणारे सुमारे ३९% उमेदवार कोट्यधीश आहेत ज्यांची सरासरी मालमत्ता ₹६.२१ कोटी असल्याची माहिती एडिआर या संस्थेने दिली.
२५ मे रोजी सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये कुरुक्षेत्रातील भाजपा उमेदवार नवीन जिंदाल यांनी सर्वाधिक १,२४१ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे, त्यानंतर संतरुप मिश्रा यांची ४८२ कोटी रुपये आणि सुशील गुप्ता यांची १६९ कोटी रुपयांची संपत्ती आहे, अशी माहिती एडिआरने विश्लेषणाच्या आधारे दिली.
लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या ८६६ उमेदवारांपैकी ३३८ (३९%) कोट्यधीश आहेत आणि लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणूक लढवणाऱ्या प्रति उमेदवाराची सरासरी मालमत्ता ₹६.२१ कोटी असल्याचेही सांगितले.
प्रमुख पक्षांमध्ये बीजेडीचे सर्व सहा उमेदवार, आरजेडी आणि जदयूचे प्रत्येकी चार उमेदवारांपैकी चार उमेदवार, भाजपाच्या ५१ उमेदवारांपैकी ४८ (९४%), सपाच्या १२ पैकी ११ (९२%) उमेदवार, २० काँग्रेसच्या २५ उमेदवारांपैकी (८०%), AAP मधील ५ उमेदवारांपैकी ४ (८०%) आणि AITC मधील ९ उमेदवारांपैकी ७ (७८%) उमेदवारांनी ₹१ कोटींपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे.
Marathi e-Batmya