राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आज आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सच्या खात्यावरून व्हायरल केला. त्यावरून सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उडविली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यानच्या काळात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनिल तटकरे आणि स्थानिक आमदार संजय बन्सोड यांना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन दिले. तसेच खेळाचे पत्ते उधळत माणिकराव कोकाटे अशा मंत्र्याला घरी बसवा आणि त्यांना पत्ते खेळावा अशी मागणी केली.
मात्र महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाजूच्या खोलित नेऊन बसविले. मात्र काही वेळातच महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या एकेका कार्यकर्त्यांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेत महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना होत असलेल्या मारहाणीला मूक संमती असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले.
महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…
लातूर येथील विश्रामगृहात खा. @SunilTatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला. यावेळी या… pic.twitter.com/vRQCDlRCpq
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 20, 2025
दरम्यान, छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता मंत्र्यांना संवेदनशील नसल्याची टीका करत सभागृहात शेतकऱ्यांप्रती निर्णय प्रक्रिया होत असतात. पण कृषी मंत्रीच आता सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळताना दिसत आहेत. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीची राजकिय किमत अजित पवार यांच्या पक्षाला मोजावी लागणार असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya