मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर प्रफुल पटेल मोजक्या शब्दात म्हणाले, मला माहिती नाही पण मुश्रीफ… प्रफुल पटेल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार अद्यापही लटकतीच

केद्रांत भाजपाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी वरळी येथील एका मालमत्ता खरेदी प्रकरणी ईडीने कारवाई सुरु केली. तसेच या तपासात अद्याप काय सापडले काय नाही याबाबतची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आली नाही. मात्र त्यांचे पक्षातील सहयोगी तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दिड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई करत सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले. यासंदर्भात प्रफुल पटेल यांना विचारणा केली असता त्यांनी मुश्रीफ यांच्यावरील कारवाईबाबत अत्यंत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने शनिवारी सकाळी दुसऱ्यांदा छापा टाकला. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर जमा होत ईडी आणि भााजपाच्या विरोधात घोषणा दिल्या. अखेर या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

यासंदर्भात माजी केंद्रीयमंत्री, खासदार प्रफुल पटेल यांना विचारले असता ते म्हमाले, या कारवाईबद्दल मला सध्या पूर्ण माहिती नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशा कारवायांना ऊत आले आहे. मात्र, आमचे सहकारी हसन मुश्रीफ अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा ईडीला मिळणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, देशातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. सध्याचे सरकार ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या हेतुने करीत आहे. हे देशांतर्गत विविध राज्यात घडत असलेल्या कारवाईवरून दिसून येतेच. ईडी, सीबीआय या स्वतंत्र अधिकार असलेल्या तपास संस्था आहेत. ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतात, असे सरकार म्हणते. मात्र, या कारवायांमधून मोजक्याच लोकांना लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्नही पटेल यांनी उपस्थित केला.

About Editor

Check Also

फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा

अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *