पुण्याच्या बैठकीला अजित पवार, शरद पवार हजर, सुप्रिया सुळे-शेळके वाद, कौतुक सुळेंच्या सूचनेचे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्रित हजर

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित हजर राहणार असल्याने या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे बघण्याचे टाळल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

मात्र या बैठकी दरम्यान बारामतीला देण्यात आलेल्या निधीवरून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांच्यात चांगलीच वादावादी झाल्याची चर्चा सुरु झाली. यावेळी सुनिल शेळके यांनी इतक्या वर्ष बारामतीला जास्त निधी दिला जात होता. त्यावर कधी आम्ही बोललो का असा सुप्रिया सुळे यांना केला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तो तुमचा प्रश्न आहे असे सांगत सुनिल शेळके यांना निरूत्तर केले. विशेष म्हणजे या बैठकीत शरद पवार उपस्थित असताना निधीवरून ही वादावादी सुरु होती.

कालांतराने याच बैठकीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यापूर्वी राज्यातील सर्वपक्षिय खासदारांची बैठक राज्य सरकारकडून बोलविली जात होती. तसेच त्या बैठकीत राज्यातील प्रमुख प्रश्नावर चर्चा करून त्या चर्चेची पुस्तिका सर्व खासदारांना पाठविली जात होती. आणि ते प्रश्न खासदारांमार्फत संसदेत उपस्थित करण्यात येत होते. मात्र हल्ली या गोष्टी होताना दिसत नाहीत, असे पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर अजित पवार यांनी ही सूचना चांगली असल्याचे सांगत खासदारांच्या बैठकीतबाबत लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून सांगम्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा फोन लागू शकला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचू शकली नाही.

दरम्यान, पुण्याच्या बैठकीनंतर सुनिल शेळके यांच्याशी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वादावादीवरून प्रश्न विचारला असता, बारामतीला देण्यात आलेल्या निधीवरून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र आता आमच्या मतदारसंघातही जास्तीचा निधी मागितल्याचे स्पष्ट केले.

तसेच सुनिल शेळके यांना अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच पक्ष फुटीनंतर एकत्रित आल्याबाबत विचारले असता म्हणाले की, जर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित आले तर चांगलेच आहे अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करत अधिक बोलण्याचे टाळले.

About Editor

Check Also

सिंचन प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *