केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला जनतेला दिलासा द्याचा असतो

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय करात कपात करण्यात येत असल्याचे जाहिर केले. तसेच मागील वेळी करात कपात केल्यानंतर ज्या राज्य सरकारांनी त्यांच्या करात कपात केली नाही त्यांनी यावेळी तरी करात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर राज्याचे भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो असा उपरोधिक टोला लगावला आहे.
केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे. गरीब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे. आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो असेही ते म्हणाले.
केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवर प्रति लीटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये आणि डिझेल ७ रुपये प्रति लीटरने कमी होईल, असे सीतारामन यांनी ट्विटरद्वारे जाहिर केले. त्यांच्या या घोषणेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत करत ठाकरे सरकारला टोला लगावला.
पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अनेकानेक आभार! यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष १ लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी ६१०० कोटी रुपये आर्थिक भार येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *