आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी देत अवमान केला. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत हक्कालपट्टी करण्याची आग्रही मागणी केली.
विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या विधानावर अद्याप कोणताही खुलासा केला नाही की सुप्रिया सुळे यांची माफीही मागितली नाही. परंतु सत्तार यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रातून दिला.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल!#SupriyaSule
— महेश तपासे (@maheshtapase) November 7, 2022
विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणा पलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. @supriya_sule ताई यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मंत्री @AbdulSattar_99 यांची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.@NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil#abdulsattar #NCP pic.twitter.com/KSqUlNPyll
— महेश तपासे (@maheshtapase) November 7, 2022
Marathi e-Batmya