राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी वादग्रस्त व्यक्तव्ये करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याची दखल घेतली. तसेच माणिकराव कोकाटे यांना फटकारत काही सूचनाही केल्या. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त व्यक्त केले होते. त्यानंतर नुकतेच अवकाळी पावसामुळे आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाताला आलेली पिके गेली. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का असे वक्तव्य केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. या वक्तव्याची दखल अखेर अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना चांगलेच फटकारले.
अजित पवार यावेळी माणिकराव कोकाटे यांना उद्देशून बोलताना म्हणाले की, काही गोष्टी बोलून का दाखवता, मनात ठेवायच्या असतात असे सांगत मला हे वादग्रस्त वक्तव्य फार महागात पडतय अशा शब्दात फटकारले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना मी काही दिवसांपूर्वी सांगितल होतं की, शेतकऱ्यांच्या बाबत अशी वक्तव्ये करता कामा नये. शेवटी आपला बळीराजा आहे. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे. सर्वच गोष्टी आम्हालाही माहिती आहेत. आम्हीही शेतकरी आहोत. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवता असा सवाल करत मनात ठेवायच्या असतात अशी सूचनाही यावेळी केली. पण माणिकराव कोकाटे यांना अजून अशा गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला फारच महागात पडतय असेही यावेळी सांगितले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे एका शेतीची पाहणी करताना म्हणाले होते की, कापणी केलेल्या शेतीचे पंचनामे करून काय करणार असा सवाल करत ढेकळांचे पंचनामे पंचनामे करायचे का असा सवालही उपस्थित करत तसेच घरात आणून ठेवलेल्या पिकांचे करता येणार नाही. शेतात नुकसान झालेले कांदे आणि अन्य जे काही पिके असतील त्यांचे रितसर पंचनामे केले जातील असे सांगितले होते.
या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, सध्या शेतात कपाशी नाही, सोयाबीन नाही. आता फळबागा आहेत. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. पण तुम्ही माझ्या शब्दांचा अर्थ वेगळा घेता त्याला मी काय करू असा प्रश्नार्थक सवालही यावेळी केला. आता ज्या शेतात काही नाही, तेथील पंचनामे काय करणार असा सवाल करत पण मी कांद्याच्या बाबतीत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya