अंबादास दानवे यांची मागणी,… शैक्षणिक आराखड्याच्या अभिप्रायसाठी मुदत वाढ दया शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली मागणी

राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण विभाग व मुंबई विभाग या विभागातील शिक्षक, पालक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर आराखड्यातील त्रुटींवर अधिक चांगले काम करता येईल व एक परिपूर्ण आराखडा तयार करण्यास मदत होईल. वस्तूस्थिती पाहता शैक्षणिक विभागाने नागरिकांना अभिप्राय देण्यास दिलेला कालावधी कमी असल्याकडे लक्ष वेधले.

पुढे अंबादास दानवे म्हणाले की, शैक्षणिक विभागाने ३ जून, २०२४ पर्यंत अभिप्राय सादर करण्यास दिलेला आहे. मात्र आराखड्यातील त्रुटी दूर करुन परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हा कालावधीला १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *