केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत असून गडकरी हे त्यांच्या सोबत असल्याचा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी लगावला.

बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र तरी असतो. आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. मात्र आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पहा असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *