राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदी या नेत्यांची नियुक्ती अजित पवार यांच्या सुचनेनूसार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली नियुक्ती

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

ही नियुक्ती पक्षाच्या सशक्त संघटनात्मक रचनेत एक महत्त्वाचा टप्पा असून, राज्यभरात पक्षाची विकासाभिमुख विचारधारा प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही पावले अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांकडून पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.

पक्षाच्या वतीने सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपले मार्गदर्शन, परिश्रम आणि निष्ठा यामुळे पक्ष अधिक मजबूत आणि जनतेचा विश्वास संपादन करणारा ठरेल.

दरम्यान, पुण्याच्या रूपाली ठोंबरे-पाटील आणि अमोल मिटकरी यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी केली. काही महिन्यापूर्वी रूपाली ठोंबरे-पाटील आणि रूपाली चाकरणकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यानी या दोघांची बैठक बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंत

सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदी केली यांची नियुक्ती

अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सावली दळवी, रूपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, काशिनाथ तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाथ आदिक, सूरज चव्हाण, विद्याधर कमलाकर, श्याम साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *