राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयासह आमदार बंब यांच्या विरोधात शिक्षकांचे आंदोलन वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक भारतीची मागणी

आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या विरोधात शिक्षक भारतीच्या वतीने काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. त्यानुसार आज राज्यभर बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

तसेच शिक्षक भारतीच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना ईमेलपाठवण्यात आल्याचेही मोरे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फॉर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी शनिवार २७ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षक भारतीच्या सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवार २९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा व राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. ९९.९९ % शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. दोषींवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही पण त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये. वर्गात लावलेल्या शिक्षकांच्या फोटो संदर्भात काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? असा प्रश्न शिक्षक भारतीच्या वतीने उपस्थित केला गेला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *