मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणा-या मंत्री लोणीकरांची उमेदवारी रद्द करा काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले. तसेच मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत असल्याचे सिध्द होत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनी दिली.
बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहील्याचेही त्यांनी सांगितले.
बबनराव लोणीकर यांच्या संबंधित भाषणाची ध्वनीचित्रफीची लिंक https://drive.google.com/open?id=1fE-6PalEOdr3AcuMe7p13qpFmhZ5m-Q1

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *