Breaking News

ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळ यांची माहिती, अधिवेशानात सर्वपक्षिय बैठक ओबीसी-मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांची एकत्रित बैठक घेणार

मागील काही महिन्यापासून राज्य मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वादाची परिस्थिती आहे. तसेच दोन समाजात वितुष्ट निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या वतीने ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन करणाऱ्या गणेश हाके यांच्या उपोषण स्थळाला भेट देणार असल्याची माहिती दिली. तसेच पावसाळी अधिवेशात मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या संदर्भात सर्व पक्षिय बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.

आज सकाळी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून गणेश हाके यांनी सुरु केलेल्या उपोषणावरून आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गणेश हाके यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून काही प्रश्न उपस्थित केले. तर मनोज जरांगे पाटील यांनीही ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मराठा आरक्षण विरूध्द ओबीसी समाज असा सामना निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आज राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या प्रश्नावर गणेश हाके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील काही जण गणेश हाके याच्या आंदोलनस्थळी जाणार आहोत. तेथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलकांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील सगे सोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी केली. त्याबाबत कायद्यात जी काही तरतूद आहे त्या तरतूदीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच छगन भुजबळ म्हणाले की, काही जणांना विविध मागास जातींचे प्रमाणपत्र काढून शासकिय फायदे लाटण्याची सवय असते. अशा खोटे जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांच्या विरोधात एक मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेत जे कोणी बोगस जात प्रमाणपत्र मिळविणारे आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कायद्याने बोगस जात प्रमाणपत्र काढणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, पावसाळी अधिवेशात मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलकांच्या प्रश्नावर सर्वपक्षिय बैठकीत आयोजन करण्यात येणार आहे. त्या बैठकीत दोन्ही समाजाच्या आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. तसेच सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबतही त्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *