विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेसनाचा आजचा शेवटचा दिवस. त्यात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कोण काय बोलणार आणि सत्ताधारी त्यावर उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान जयंत पाटील यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानत जाहीरनामा पहायचा तर तुमचा पाहायचा असेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, माझा नेहमी प्रयत्न असतो की, विरोधकांच्या बाकावर बसून जे बोलतो ते इकडे (सत्ताधारी) बाकावर आल्यानंतर पूर्ण केलं पाहिजे. मी जयंत पाटील यांचे आभार मानतो, कारण त्यांनी महत्वाचे मुद्दे आठवण करून दिली. २०१९ मध्ये सरकार आमचं आलं होतं. पण काही कारणाने सरकार तुमचं आलं. जाहिरनाम्यांचा विचार करायचा झाल्यास तुमच्या जाहिरनाम्याचा विचार करावा लागेल. आम्हाला माहित होतं की, अडीच वर्षात निवडूण यायचं असेल तर २०-२० मॅच खेळावी लागले. आम्ही सगळे बॅटसमन मैदानात उतरविले आणि बॅटिंग अशी केली की विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून इथे आलो असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक मुद्दे सभागृहात मांडले गेले. सगळ्या मुद्यांना एका उत्तरात देणं शक्य नाही. पण मी धोरणात्मक बाबींवर बोलणार आहे. नागपूरंच अधिवेशन अंतरिम अस अधिवेशन असतं. त्यामुळे या अधिवेशनात प्रश्नोत्तरे ठेवत नाहीत. या अधिवेशनात पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत हे आपलं सरकार म्हणून धोरण असतं. सात दिवस अधिवेशन सुरु होतं.बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. आमच्यासाठी हे सरकार नव्याने आलं असलं तरी मागच्या सरकारची काम संथ गंतीने आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मी आहे. मात्र जबाबदाऱ्यांपेक्षा सामुहिकदृष्ट्या आम्ही जे निर्णय अडीच वर्षात घेतले त्या दृष्टीने सरकार म्हणून कामकाजाला सुरुवात केली असेही यावेळी सांगितले.
20-20 मॅच खेळलो आणि चॅम्पियन होऊन आलो!
हातात घेतलेली कामे गतीने पुढे नेण्यासाठी, मराठवाडा-विदर्भाच्या मागास भागात परिवर्तन करण्यासाठी या सरकारचे काम सुरु…(विधानसभा, नागपूर | दि. 21 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #Development pic.twitter.com/LkvrSKDxOS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 21, 2024
Marathi e-Batmya