सीईटीच्या परिक्षा पुढे ढकलल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *