भाजपाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्र सहभागी झाल्याचा दावा केला असता प्रत्येक प्रसिध्दीपत्रकासोबत मोफत हाजमोला गोळ्या वाटण्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा खोचक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल करत यापुढे प्रेसनोटसोबत भाजपाने हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावे, अशी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
आंदोलनासंदर्भात भाजपाने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते, असा दावा केला आणि त्यानंतर ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब व ८,७५,४८७ लोक आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले. १ तास ४७ मिनिटात ६,२५,४८७ ने हा आकडा वाढल्याचे दाखवण्यात आले असून याचा मिनिटाचा हिशोब केला तर एका मिनिटात ५८४५.६७२८९७१ एवढा होत आहे. याच वेगाने भाजपाने गणित केले तर १५ दिवसानंतर अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता. आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे संबंध राज्याने पाहिले असताना भाजपाचा हा दावा पोकळ व हास्यास्पद असल्याचे दिसते. भाजपाला खोटे बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडल्याची उपरोधिक टीका केली.
कोरोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपाची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *