चला शासकिय कर्मचाऱ्यांनो ५ टक्के हजेरी लावा, पण कामकाज चालवा सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी
एकाबाजूला कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. मात्र प्रशासनाचा गाडा थांबू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द, मालेगांव महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकिय कार्यालये ५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर संसर्ग होणार नाही या उद्देशाने ३ फूटाचे अंतर ठेवून काम करण्यासही सामान्य प्रशासन विभागाने बजावले आहे.
कार्यालयात येताना तोंडाला मास्क बांधून येणे, वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटायर्सने हात धुणे आदी गोष्टी कर्मचारी-अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्याने त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कामाच्या निमित्ताने कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींनीही या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कार्यालयीत ५ टक्के कर्मचारी हे रोटेशन पध्दतीने कार्यालयात येवून कामकाज करतील अशी सूचनाही सामान्य प्रशासन विभागाने दिली.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *